27 April 2024 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनिकमध्ये व्यस्त होते | आरजेडीचं टीकास्त्र

Bihar Assembly Election 2020 Result, RJD, Congress, Rahul Gandhi

पाटणा, १५ नोव्हेंबर: बिहारमधील एनडीएच्या यशानंतर आणि बिहार मध्ये जेडीयूला (Bihar Assembly Election 2020 Result) नुकसान होऊन देखील सत्ता गमावावी लागल्याने महागठबंधनमध्ये (Bihar Assembly Election 2020 Congress RJD MahagathBandhan) आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुळे थोडक्यात सत्ता हातची गेल्याने आरजेडीचा संताप होतं असल्याचं वारंवार दिसत आहे. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी (RJ Senior Leader Shivanand Tiwari ) यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Congress MP Rahul Gandhi ) कार्यशैलीमुळे भारतीय जनता पक्षाला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.

कॉंग्रेस पक्ष महागठबंधनसाठी मोठा अडथळा बनला आहे. कॉंग्रेसने ७० उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. परंतु त्यांनी ७० सभा देखील घेतल्या नाहीत. राहुल गांधी बिहारमध्ये केवळ ३ दिवसांसाठी आले. प्रियांका गांधी तर आल्याच नाहीत. कारण बिहारशी त्यांचा फारसा परिचय नाही, असं शिवानंद तिवारी म्हणाले.

बिहारमध्ये आरजेडीचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या एकंदरीत मानसिकतेवर शिवानंद तिवारी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होत आहे, असा आरोप देखील तिवारी यांनी केला.

 

News English Summary: After the success of the NDA in Bihar and the loss of power in Bihar despite the loss of the JDU (Bihar Assembly Election 2020 Result), allegations are being made in the Mahagathbandhan (Bihar Assembly Election 2020 Congress RJD Mahagath Bandhan). It is often seen that the RJD is angry with the Congress for losing power. Now, senior Rashtriya Janata Dal (RJD) leader Shivanand Tiwari has directly targeted Congress president Rahul Gandhi. Shivanand Tiwari made a serious allegation that the Bharatiya Janata Party (BJP) is getting help due to the working style of Rahul Gandhi (Congress MP Rahul Gandhi).

News English Title: Bihar Assembly Election 2020 Result clashes between RJD and Congress news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x