बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही | कपिल सिब्बल यांची टीका

पाटणा, १५ नोव्हेंबर: बिहारमधील एनडीएच्या यशानंतर आणि बिहार मध्ये जेडीयूला (Bihar Assembly Election 2020 Result) नुकसान होऊन देखील सत्ता गमावावी लागल्याने महागठबंधनमध्ये (Bihar Assembly Election 2020 Congress RJD MahagathBandhan) आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुळे थोडक्यात सत्ता हातची गेल्याने आरजेडीचा संताप होतं असल्याचं वारंवार दिसत आहे. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी (RJ Senior Leader Shivanand Tiwari ) यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Congress MP Rahul Gandhi ) कार्यशैलीमुळे भारतीय जनता पक्षाला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.
बिहारमध्ये आरजेडीचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या एकंदरीत मानसिकतेवर शिवानंद तिवारी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होत आहे, असा आरोप देखील तिवारी यांनी केला.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २२ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. आता द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही हेच घडले होते. तर उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारले आहे असं देखील कपिल सिब्बल म्हणाले आहेत.
“बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही. या पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर आलेले नाही. कदाचित सगळं काही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे असे पक्ष नेतृत्वाला वाटत असावे” अशी टीका देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली.
News English Summary: On the other hand, a few days back, 22 senior Congress leaders, including Kapil Sibal, had written a letter to Sonia Gandhi expressing their displeasure. Now, in an interview to The Indian Express, Kapil Sibal has said that not only Bihar but also the people of the country where by-elections were held have rejected the Congress. Therefore, the message of the people is clear that they have rejected him, said Kapil Sibal.
News English Title: Congress leader Kapil Sibal Says Leadership is not taking up issues polls show congress is not choice of people news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
IRFC Share Price | झपाट्याने वाढलेला रेल्वे शेअर आता सातत्याने घसरतोय, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IRFC
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्सवर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत – NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL