14 December 2024 6:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता, कृष्णकुंज | शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

Maharashtra Mantralaya, Krishnakunj, MNS leader Sandeep Deshpande, Shivsena

मुंबई, १५ नोव्हेंबर: मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून विविध संघटना आणि सामान्य लोकं आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडून मदतीची अपेक्षा करत आहेत. विशेष म्हणजे त्यातील अनेक प्रश्न तडीस देखील लागत असल्याने अशी भेट घेणाऱ्यांची संख्या अजून वाढताना दिसत आहे. शिवसेनेकडे राज्याचं मुख्यमंत्री पद असताना देखील मनसेकडे समस्या घेऊन जाणाऱ्यांची संख्या अजून वाढली आहे.

दरम्यान कोरोना आपत्तीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीतून बाहेर पडून काम करावे’, असं टीकास्त्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा सोडलं आहे. त्यात मनसेने देखील आता याच मुद्यावरून शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ‘महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “राजसाहेब ठाकरे, कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28’ असं म्हणत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

कोरोनाच्या काळात गेल्या सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद होते. पण, हळूहळू बाजारापेठा, उद्योग धंदे सुरू करण्यात येत होते. पण, राज्य सरकारकडून अनेक व्यवसायांना सुरू करण्यास मनाई केली होती. या काळात जीम संघटना असो अथवा मासे विक्रेते असो, सर्व संघटनांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेनेला टोला लगावला आहे.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray should get out of Matoshri and work in the Corona disaster, ‘said Tikastra Bharatiya Janata Party leaders. In it, MNS has also indirectly attacked Shiv Sena on this issue. Maharashtra Nirman Sena general secretary Sandeep Deshpande has indirectly attacked the Shiv Sena, saying, “The new address of the Maharashtra Mantralaya is Rajsaheb Thackeray, Krishnakunj Shivaji Park, Dadar, Mumbai 28”.

News English Title: The New address of Maharashtra Mantralaya is Krishnakunj said MNS leader Sandeep Deshpande tweet on Shivsena News updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x