19 January 2022 1:26 AM
अँप डाउनलोड

Maharashtra On Top In Vaccination | २ डोस देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम | ठाकरे सरकारची कामगिरी

Maharashtra On Top In Vaccination

मुंबई, 22 ऑक्टोबर | देशात लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण होण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून राज्यातील ९ कोटी ५० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ६ कोटी ४० लाख म्हणजे ७०% जनतेचा पहिला डोस, तर २ कोटी ९० लाख म्हणजे ३५% जनतेचे दोन्ही डोस (Maharashtra On Top In Vaccination) पूर्ण झाले. दोन्ही डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Maharashtra On Top In Vaccination. 95 million people in the state have been vaccinated. 6 crore 40 lakhs or 70% of the population completed the first dose, while 29 million or 35% of the population completed both doses. Health Minister Rajesh Tope informed that Maharashtra is number one in the country in completing both the doses :

राज्यातील सर्व महाविद्यालयांत ४० लाख विद्यार्थ्यांसाठी मिशन युवा कोविड लसीकरण मोहीम २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येणार असल्याचेही टोपे तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात सांगितले.

पहिला आणि दुसरा डोस अशा दोन्ही डोसच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. एकूण लसीकरणातही पहिला क्रमांक आपण मिळवला असता, पण उत्तर प्रदेशला जास्त प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आल्याने त्यांनी पहिल्या डोसमध्ये तो क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारकडून आता योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा होत असल्याचे टोपे म्हणाले.

दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाईत काल देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. आजच्या संबोधनामध्ये पंतप्रधान कोरोना लसीकरण आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत विस्ताराने बोलण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra On Top In Vaccination said health minister Rajesh Tope.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x