12 October 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

शिंदे सर्मथकांनी मर्यादा ओलांडल्या, उद्धव ठाकरेंना लक्ष करण्याच्या नादात कदमांनी बाळासाहेबांच्या पत्नीचा अप्रत्यक्ष अपमान केला

Ramdas Kadam

Ramdas Kadam | आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर आज शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी घासत असून, वरून बाळासाहेब बघत असतील, तर तेही म्हणत असतील की माझा मुलगा (उद्धव ठाकरे) शरद पवार आणि सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला, अशा शब्दात रामदास कदमांनी शरसंधान साधलं.

त्यांनी यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. “टुनटुन करत खोके खोके बोलत आहेत, आधी लग्न करून बघा मग संसार काय असतो ते कळेल. त्यावेळी खोके काय ते कळेल, असा टोला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावलाय.

‘ही सभा बाळासाहेब ठाकरे वरून बघत असतील आणि सांगत असतील की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला आहे. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चाल माझा तुला आशीर्वाद आहे, असं बाळासाहेब वरून सांगत असतील. उद्धवजी, सध्या राष्ट्रवादीची भांडी घासताहेत आणि त्यांचा मुलगा टून टून टून… खोका खोका करत उड्या मारतंय’, अशा शब्दात रामदास कदम यांनी ठाकरे पिता-पुत्रावर निशाणा साधला.

रामदास कदमांची जीभ घसरली :
दोन वर्ष माझ्या शासकीय बैठकांत अधिकार नसताना देखील आदित्य ठाकरे ढवळाढवळ करत असत. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री. एखाद्याला संपवून टाकायचं गद्दारी याला म्हणता. मला आश्चर्य वाटतं की रश्मी ठाकरे कशा नाहीत, उद्धव ठाकरे जातील तिथे रश्मी ठाकरे असता. मासाहेब कधीच व्यासपीठावर चढल्या नाहीत. पण वेळो वेळी मी बाळासाहेबांचा मुलगा असं सांगतात. माहिती आहे, पण तुम्हाला काही शंका आहे का? असं संतापजनक प्रश्नार्थक बोलून कदमांनी अप्रत्यक्षरीत्या मासाहेबांचा अपमान केला. त्यामुळे रामदास कदम यांना पुढे तिखट टीकेचा सामना करावा लागू शकतो, तसेच शिंदे समर्थकांविरोधात सामान्य लोकांमध्ये अजून रोष निर्माण होऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ramdas Kadam rally at Dapoli check details 18 September 2022.

हॅशटॅग्स

#Ramdas Kadam(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x