13 May 2021 8:15 AM
अँप डाउनलोड

आप व शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच 'डिपॉझिट' जप्त

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष तर काँग्रेस आणि जेडीएस हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. परंतु बाकी सर्व पक्ष म्हणजे आप आणि शिवसेनेच्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होऊन पार धुव्वा उडाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आपच्या सर्व म्हणजे २९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तर दुसरीकडे भाजपचा महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी असलेला मित्र पक्ष शिवसेना सुद्धा कर्नाटक निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती. शिवसेनेने उत्तर कर्नाटकवर लक्ष केंद्रीत करत ३७ उमेदवार रिंगणात उतरवून जोरदार प्रचार सुद्धा केला होता. परंतु शिवसेनेच्या सर्वच म्हणजे ३७ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला ‘डिपॉझिट’ वाचवता आलेले नाही.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या भाजप संबंधित अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. परंतु शिवसेनेने त्यांच्या ३७ उमेदवारांचे काय झाले याच्याबद्दल एक अक्षर सुद्धा बाहेर काढलं नव्हतं. आता निवडणूक आयोगाकडून सर्व माहिती बाहेर येऊ लागल्याने सर्व पक्षांचे सत्य बाहेर आले आहे.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x