18 June 2021 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार BHR Scam | बडे मासे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात | २ आमदारही तपास यंत्रणेच्या रडारवर? लोकसभा २०२४ | रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांची तयारी
x

'राम' काँग्रेस-जेडीएस'साठी धावून आले, गेम चेंजर कायदेतज्ञ

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सत्तास्थापनेतील पेच काल सर्वोच न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. कर्नाटकात भाजपाला कायद्याच्या कचाट्यात कसं पकडायचं हेच एक शस्त्र सध्यातरी काँग्रेस-जेडीएस कडे असलं तरी त्यातही वेळे अभावी अनेक अडचणी होत्या. परंतु त्यात देशातील सर्वात यशस्वी वकीलाने स्वतःच भाजप विरोधात थेट आव्हान देण्यासाठी उतरले आहेत. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस’च्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कर्नाटकात भाजपला कायद्याच्या कचाट्यात कसं पकडायचं हाच मुळात काँग्रेस-जेडीएस’साठी किचकट विषय होता. त्यात वेळेच्या मर्यादेमुळे सुद्धा दोन्ही पक्ष हैराण झाले असताना त्यांना एक आनंदाची वार्ता मिळाली आहे. कारण देशातील सर्वात यशस्वी वकील राम जेठमलानी यांनी कर्नाटकातील सत्तास्थापनेवरून थेट भाजप विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

ज्येष्ठ अनुभवी वकील राम जेठमलानी यांनी थेट प्रश्न केला की, ‘भाजपने कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी असं काय सांगितलं की त्यांनी भाजपकडे बहुमत नसतानाही त्यांना थेट सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आणि त्याचा खुलासा राज्यपाल वजुभाई वाला यांनी करावा अशी थेट विचारणा करत राम जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांनी, त्यांच्या मुद्द्यांवर सखोल विचार विनिमय केला. उद्या शुक्रवारी म्हणजे १८ मे रोजी न्यायमूर्ती ए.के. सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय खंडपीठापुढे काँग्रेसच्या कर्नाटक सत्तास्थापने संबंधित याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी स्वतः राम जेठमलानी यांना आपलं म्हणणं मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस’ला मोठा दिलासा समजावा लागेल.

हॅशटॅग्स

#Amit Shah(257)#Narendra Modi(1592)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x