नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच आज नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. देशातील अनेक नेत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्लीकडे धाव घेतली आहे. संपूर्ण दिल्लीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अटलजी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले सर्व नेते म्हणजे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला यांच्यासह विविध पक्षाचे नेते दिल्लीत एम्समध्ये दाखल झाले आहेत.
सध्या इस्पितळाच्या आवारात भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे तसेच राज्यातील अनेक नेते मंडळी लवकरच दिल्लीला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे.
