28 March 2023 9:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Artemis Electricals Share Price | हा शेअर दहापट स्वस्तात मिळणार, रेकॉर्ड डेट जाहीर, फायद्यासाठी डिटेल्स पहा Quick Money Shares | 5 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे 97 टक्के पेक्षा जास्त वाढले, टॉप शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, मजबूत फायदा SBI Credit Card | एसबीआय बँक क्रेडिट कार्डचे नियम बदलले, हे लक्षात ठेवा आणि फायद्यात राहा IRCTC Railway Ticket Discount | खुशखबर! वरिष्ठ नागरिक रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, तिकीट मध्ये पुन्हा सूट मिळणार? Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही
x

इटलीचे पंतप्रधान ज्यूसपे कॉन्टे यांच्याकडून १२ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर

जेनोआ : इटलीची राजधानी जेनोआ येथे आलेल्या जोरदार वादळाच्या तडाख्याने मोरांडी पूल कोसळला आहे. परंतु त्यामुळे पूलाखालील असलेल्या वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दुर्दैवाने या भयानक अपघातात तब्बल ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान ज्यूसपे कॉन्टे यांनी १२ महिन्यांसाठी आणीबाणीची घोषणा केली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्य पावलेल्या लोकांसाठी जवळपास ४० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनतर बचावकार्य सुद्धा जोरात सुरु असून परिस्थिती कशी आटोक्यात आणली जाईल याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.

जिनोआमध्ये अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यात मंगळवारी मुसळधार पावसाबरोबरच वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने मोरांडी पुलाचा मोठा म्हणजे जवळजवळ ६०० फुटाचा भाग कोसळला. त्यात ३५ गाडय़ा आणि अनेक ट्रक ४५ मीटर खाली असलेल्या रेल्वे मार्गावर कोसळल्या, यात ३९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोरांदी पुलाच्या देखरेखीची जबाबदारी ऑटोस्ट्रेड या कंपनीवर देण्यात आली होती. त्यामुळे या कंपनीची मान्यताही काढून घेण्यात येणार असून, पुलाची जबाबदारी असलेल्या ऑटोस्ट्रेड कंपनीला १५० दशलक्ष युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x