15 May 2021 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे
x

राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती - नितीन गडकरी

BJP, bjp maharashtra, mns, raj thackeray, nitin gadkari, rahul gandhi, ncp, sharad pawar, nagpur

आज ए.बी.पी. माझाला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत बोलताना नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंबद्दल १ खंत व्यक्त केली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुद्द्यावर भाष्य केलं. मी ज्यांच्याशि मैत्री करतो त्यांचा हात कधीच सोडत नाही, राज ठाकरेंचे विचार अगदी सुस्पष्ट होते. माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा जवळपास समान आहे, परंतु काँग्रेसची विचारधारा आणि राज ठाकरेंची विचारधारा वेगवेगळी आहे. राज आणि राष्ट्रवादीच्या विचारांमध्ये ताळमेळ नाही आणि युती हि नेहमी विचारांच्या आधारावर करावी तसेच राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती, असं नितीन गडकरी म्हणाले. निवडणुकीत राज ठाकरे काय बोलतील हे त्यांचं त्यांनी ठरवावं, परंतु आमची आणि शिवसेनेची युती हि हिंदुत्वावर आधारित आहे.

गरिबांचा विकास करताना मी कधीच राजकारण करत नाही आणि करणारहि नाही. जे जगात नाही ते मी नागपुरात करण्याचा प्रयत्न करत आहे, नागपूरच्या जनतेने सेवेची संधी दिली म्हणून हे शक्य झालं. विचारांची लढाई असली पाहिजे, राहुल गांधींनी टीका करताना पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे असा सल्लाही गडकरींनी राहुल गांधींना दिला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x