2 July 2020 9:03 PM
अँप डाउनलोड

चौकीदार सो रहा हैं! चीनच्या दोन बोटी परवानगी नसताना दाभोळ खाडीत

Konkan, Dabhol

रत्नागिरी : भारताचा सागरी किनारा किती असुरक्षित आहे त्याचा अजून एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. अरबी समुद्रच्या मार्गे कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी करणाऱ्या बोटी आढळून आल्या आहेत. संबंधित बोटींवर तब्बल ३७ खलाशी असल्याचं वृत्त आहे. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला आहे. परंतु या बोटींकडे कुठलीही परवानगी नाही अशी महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

चीनच्या या मासेमारी बोटी १५० फुट लांबीच्या आहेत. या मोठ्या बोटी आढळून आल्याने सुरुवातीला सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या देशाच्या हद्दीत जाण्यासाठी संबंधीत बोटींना विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्यानंतरच अशा बोटी त्या सागरी हद्दीत प्रवेश शक्य असतो. त्यामुळे दाभोळ पोलीस आणि विविध सुरक्षा संस्था आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

या प्रकरणी रत्नागिरीतल्या खाजगी मरीन एजन्सीची देखील या गंभीर विषयाला अनुसरून सखोल चौकशी सुरु असल्याचे वृत्त आहे. या बोटींविषयी कुठलीच पूर्वकल्पना नसल्याने त्याविषयीचं गुढ वाढलं आहे. भारतामध्ये चीनबद्दल कायम संशयाचं वातावरण असल्याने सुरक्षा कारणांबाबातही चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. परवानगी नसताना या बोटी जर दाभोळ खाडीपर्यंत आल्या असतील तर त्या एवढ्या आतमध्ये येईपर्यंत कुणालाच कसं कळालं नाही असाही प्रश्न विचारण्यात येतोय. तटरक्षक दल किंवा नौदलाला या बोटींविषयी काही माहिती का कळली नाही असाही प्रश्न आता विचारण्यात येतोय.

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही कळविण्यात आल्याची माहिती आहे. या बोटींकडे कुठलीही परवानगी आढळून आली नाही तर तो सागरी सुरक्षा यंत्रणांना धक्का असणार आहे. या आधाही कोकण किनाऱ्यावरून अवैध शस्त्रास्त्र आल्याची प्रकरणं उघडकीस आली होती.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#india(157)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x