20 August 2022 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
x

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार

 BJP MP Udayanraje Bhonsale, NCP, Sharad Pawar

नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी: खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही भेट होणार आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शरद पवार आणि उदयनराजे हे दोघेही राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे दोघांची सदनामध्येही भेट होऊ शकते. परंतु ज्या अर्थी उदयनराजे पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेणार आहेत त्या अर्थी या भेटीत नक्कीच काही खास असणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सप्टेंबर २०१९मध्ये उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच गळती लागलेल्या राष्ट्रवादीला उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्याने आणखी एक धक्का बसला होता.

 

News English Summary: MP Udayan Raje Bhosale will meet NCP President Sharad Pawar today. The meeting will be held at Sharad Pawar’s residence in Delhi. The visit will take place around 5.30 this evening. This is the first visit after Udayan Raje left the NCP. Therefore, there is a lot of discussion in the political circles.

News English Title: BJP MP Udayanraje Bhonsale will meet NCP President Sharad Pawar today news updates.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x