19 April 2024 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट ED कार्यालयात जमा

Minister Vijay Wadettiwar, collected passport, ED office

मुंबई, ७ जानेवारी: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती पासपोर्ट अर्जात लपवल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

भांगडिया यांनी केलेल्या याचिकेत विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या गुन्हे लपवल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. त्यावर कारवाई झाली नाही म्हणून ते शेवटी हायकोर्टात गेले. अधिक माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमचा पत्ता (पर्मनंट ऍड्रेस) दिला होता. तेथील पोलीस ठाण्यामधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत असे नमूद होते.

त्यामुळे भांगडिया उच्च नायायालयात गेले. त्यावेळी उच्च नायायालयाने पासपोर्ट ऑफिसला पाठवण्यासाठी नोटीस काढली. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळले आहेत. हे माझ्या विरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला आहे. ‘माझ्यावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल नसून जे चार गुन्हे दाखल आहेत ते किरकोळ राजकीय गुन्हे आहेत’, असा दावा केला आहे.

 

News English Summary: State Minister for Relief and Rehabilitation and Congress leader Vijay Wadettiwar’s passport has been confiscated. The action was taken after it was revealed that Vijay Wadettiwar had hidden the details of the case against him in his passport application.

News English Title: Minister Vijay Wadettiwar collected his passport at ED office news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x