13 May 2021 7:33 AM
अँप डाउनलोड

त्या मुलाखतीवरून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची 'लायकी' काढली

Devendra Fadnavis, MahaVikas Aghadi government, Saamana Interview

मुंबई, २८ नोव्हेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” अशी तिखट प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाही,’ अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Opposition Leader Devendra Fadnavis Press conference) घेऊन हे स्पष्ट केलं. पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या प्रकरणात कोर्टाने (Arnab Goswami and Kangana Ranaut court case) दिलेल्या निकालावरून राज्यात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय राज्यात सत्ता यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचंही कोर्टाने मारलेल्या ताशेऱ्यांवरून स्पष्ट होत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हे निर्णय पुरेसे असले तरी आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी ‘सामना’ला मुलाखत (Saamana Newspaper Interview) दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं, अशी टीका त्यांनी केली.

 

News English Summary: The Maha Vikas Aghadi government led by Chief Minister Uddhav Thackeray has completed its year. Against this backdrop, the Bharatiya Janata Party has attacked the government. Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis slammed the Thackeray government’s role. At the same time, the interview given by Chief Minister Thackeray to the match is not worthy of comment, ”said Fadnavis.

News English Title: Opposition Leader Devendra Fadnavis slams MahaVikas Aghadi government in Press conference News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(600)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x