18 November 2019 12:00 AM
अँप डाउनलोड

मनसेचा पहिला उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा

Farmer Dharma Patil, Farmer narendra Patil, Farmers suicide, MNS, Raj Thackeray, Maharashtra Navnirman Sena, Maharashtra Vidhansabha Election 2019, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई: मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज यांनी आगामी विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवण्याची घोषणा केली. तसंच, ५ ऑक्टोबरला जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडेन, असंही स्पष्ट केलं. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा मेळावा झाला. राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी पाच ते दहा मिनिटे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसे निवडणुका लढणार असल्याची माहिती दिली. किती आणि कुठल्या जागा लढवणार याबाबत योग्य वेळी सांगेन असं ते म्हणाले.

राज्य सरकारने वीज प्रकल्पासाठी धर्मा पाटील कुटुंबीयांची जमीन संपादित केली होती आणि त्यानिमित्ताने हतबल होऊन आणि न्याय मिळण्याच्या उद्देशाने शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात खेटा मारल्या होत्या. परंतु तिथे ही न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी जानेवारी महिन्यात मंत्रालयातच विष प्राशन करून आत्महत्या केली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. नरेंद्र पाटील मनसेकडून निवडणूक लढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं. याशिवाय नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले असून ते देखील निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं.

‘बरेच दिवस मी बोललो नव्हतो. आता सुरुवात केली आहे. सगळं सांगेन. महाराष्ट्राच्या जनतेपुढं सांगेन,’ असं राज यांनी सांगितलं. त्यामुळं राज ठाकरे नेमकं काय बोलणार याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पुन्हा एकदा राज यांची ठाकरी तोफ धडाडणार आहे.

दरम्यान, मध्यंतरी मनसे काँग्रेस आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा रंगली होती; परंतु काँग्रेसकडून मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता न दर्शविल्याने ही चर्चा मागे पडली; मात्र त्याचवेळी ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेली जाहीर भूमिका व त्यातून त्यांनी अन्य पक्षांना विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा गळ घातला होता. त्यावेळी मनसे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा होती.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(472)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या