14 April 2024 1:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का? SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये Royal Enfield | रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी खुशखबर! कंपनी 'या' 3 नवीन बाईक्स लाँच करणार, फीचर्स डिटेल्स जाणून घ्या
x

HSC Result 2021 | बारावीचा निकाल उद्या दुपारी 4 वाजता | कुठे पहाल निकाल?

Maharashtra HSC Result 2021

मुंबई, ०२ ऑगस्ट | HSC बोर्डाच्या 12 वीचा निकाल उद्या सायंकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सोमवारी ही माहिती जारी केली. http://mh-hsc.ac.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक टाकून निकाल पाहता येणार आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांसह जवळपास सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्या. यावर्षीचा बारावीचा निकाल परीक्षा न घेता मूल्यमापन पद्धतीवर जारी केले जाणार आहेत. यामध्ये दहावी, अकरावीचे मार्क आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांचे गुण यांचा विचार केला जाणार आहे.

शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांचा बारावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी जारी केला जाणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार, अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पाहता येणार आहे.

शिक्षणमंत्र्यांनी ट्विटरवरुन दिली माहिती:
12 वी बोर्डाच्या निकाला संदर्भांत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.

निकाल कुठे पाहायचा?
1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in.

www.mahresult.nic.inhttps://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra HSC Result 2021 declared today LIVE news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x