15 December 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती | मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींकडून चौकशी

Anil Deshmukh, Parambir Singh, Sachin Vaze

मुंबई, ३१ मार्च: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी अखेर महाविकास आघाडी सरकारने चौकशी समितीची घोषणा केली आहे. ही समिती पुढील 6 महिन्यात अहवाल देणार आहे.

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला सहा महिन्यात आपला अहवाल सादर करायचा आहे. विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती कैलास चांदीवाल याची माहिती;

  1. न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल हे मूळचे औरंगाबादचे आहेत
  2. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात साडेसहा वर्षे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.
  3. सध्या ते महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.
  4. तसेच रेराच्या अपिलीय न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती होते.
  5. शिर्डी संस्थानच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे.

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh had written a letter to state Home Minister Anil Deshmukh making serious allegations. The Mahavikas Aghadi government has finally announced a committee of inquiry into the matter. The committee will report in the next six months.

News English Title: Maharashtra government has finally announced a committee of inquiry into the matter of Parambir Allegations on home minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x