11 April 2021 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

आज बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन | विरोधकांना निमंत्रण नाही

Bhumi Pujan ceremony, Shiv Sena, Balasaheb Thackeray, National Memorial

मुंबई, ३१ मार्च: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुख्यमंत्री कार्यालयाने नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या दिवसभरातील विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या माहितीनुसार उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई महापौर यांच्या निवसास्थानाच्या परिसरात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने एकूण ४०० कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे २५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

 

News English Summary: Bhumi Pujan ceremony of Shiv Sena chief Balasaheb Thackeray National Memorial will be held today (March 31). The ceremony has been organised by Chief Minister Uddhav Thackeray at 5 pm today. The old residence of the mayor at Shivaji Park is the planned site of the memorial. The Chief Minister’s Office has informed about this.

News English Title: Bhumi Pujan ceremony of Shiv Sena chief Balasaheb Thackeray National Memorial will be held today news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1074)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x