17 November 2019 9:51 PM
अँप डाउनलोड

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची आज ३४ वी पुण्यतिथी

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज ३४ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह देशातील अनेक मान्यवरांनी इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली आहे. याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच इंदिरा गांधींच्या दिल्लीयेथील समाधीस्थळी जाऊन राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी डॉ. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आदरांजली वाहिली. तसेच इंदिरा गांधींच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले आहे की, “आजीने मला खूप काही शिकवलं आणि माझ्यावर खूप प्रेम केलं. तिने देशातील सामान्यांसाठी सुद्धा खूप काही केलं. मला तिचा सार्थ अभिमान आहे’ अशा शब्दात काँग्रेस अध्यक्षांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इंदिराजी देशाच्या एक सशक्त महिला पंतप्रधान म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या रोखठोक निर्णयांमुळे जगाला भारतापुढे नमते व्हावं लागलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् अत्यंत कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला होता. भारतानं त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करत अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार मिटविण्यासाठी सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात भारत एक आण्विक संपन्न देश म्हणून उदयास आला होता. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला देशातील विरोधकांनी नेहमीच प्रचंड विरोध केला हा इतिहास आहे. परंतु कोणालाही न जुमानता त्यांनी देशाहितासाठी कठोर निर्णय घेतले आणि त्यामुळेच त्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

हॅशटॅग्स

#Congress(295)#Rahul Gandhi(124)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या