14 December 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

झारखंड- महिला शिक्षिकेच्या खुनातील आरोपी भाजपचा उमेदवार; मोदींकडून जोरदार प्रचार

PM Narendra Modi, Jharkhand Assembly Election 2019, BJP Campaign

रांची: झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले डॉ. शशिभूषण मेहता यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत व्यासपीठावर स्थान मिळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शशिभूषण मेहता यांच्यावर खुनाचा आरोप असून ते सध्या जामीनावर आहेत. परंतु, महिला शिक्षिकेच्या खुनात आरोपी असलेल्या शशिभूषण मेहता यांना भारतीय जनता पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, ते आज चक्क पंतप्रधान मोदींच्या स्टेजवर दिसले.

शशिभूषण मेहता यांनी मोदींच्या सभेला उपस्थिती लावत चक्क स्टेजवर प्रवेश केला. त्यानंतर, मोदींसोबत स्टेजवर एका खुनातील आरोपीला स्थान मिळतंय, असे म्हणत त्यांचा फोटो तेथील समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. भारतीय जनता पक्षाने शशिभूषण यांना पंकी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मेहता यांच्यावर खुनाच आरोप असून २०१२ मध्ये ही घटना घडली आहे. मेहता हे ऑक्सफर्ड पल्बिक स्कुलचे संचालक असून २०१२ मध्ये त्यांना शाळेतील शिक्षिकेच्या मर्डरप्रकरणी अटक करण्यात आली होती. स्कुल वार्डन सुचित्रा मिश्रा यांचा खून केल्याचा आरोप मेहता यांच्यावर आहे.

मागील काही दिवसांपासून झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा घेण्यात येत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अमित शाह यांच्या सभेला गर्दी न झाल्याने त्यांनी आपल्या भाषणामधून नाराजी व्यक्त केली. (Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Rally for Jharkhand Assembly Election 2019)

“हे बघा, १०-१५ हजार लोकांची गर्दी केली तर आपण जिंकू का? जिंकू का? नाही… नाही जिंकणार आपण. मला गणित येतं. मी स्वत: एक व्यापारी आहे. मला फसवणं शक्य नाही. एक गोष्ट सांगितली तर करणा का? मोदींना तुम्ही आशिर्वाद देणार का? पुन्हा रघुवर सरकार सत्तेत आणणार का? रघुवर यांनी फोन दिले आहेत ते बाहेर काढा आणि आश्वासन द्या की २५-२५ लोकांना तुम्ही फोन कराल. मामाला, मामीला, काकाला, आत्याला, आजी, आजोबांना, भावांना एकूण 25 फोन करायचे आहेत. फोन करुन समोरच्या व्यक्तीला कमळासमोरचे बटण दाबायला सांगा,” असं शाह आपल्या भाषणामध्ये म्हणाले. (I know Maths because I am Businessman says Union Home Minister Amit Shah )

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात एवढं काही बोलून ठेवलं आहे की ते त्यांना देखील आठवत नसावं. महाराष्ट्रात सहानुभूती मिळावी म्हणून एका मंचावर ‘मी शरद पवारांचं बोट धरून राजकरण शिकलो’ असं म्हणाले होते. वास्तविक त्यावर स्वतः शरद पवारांनी देखील मोदींची फिरकी घेतली होती आणि माणूस बोलण्यात ‘लय हुशार’ अशी खेड्यातल्या शैलीत त्यांचा समाचार दुसऱ्या एका कार्यक्रमात घेतला होता.

मात्र, ज्या राज्यात निवडणुका लागतात तिकडच्या मोठ्या स्थानिक नेत्यांची बोटं पकडून मोदी राजकारण शिकत हे आता हास्यास्पद होत चाललं आहे. कारण आता झारखंड’मध्ये विधानसभा निवडणुका लागल्याने मोदींनी प्रचारात तिथल्या नेत्याचं बोट पकडलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी खुंटी येथे पक्षाचे उमेदवार नीलकंठसिंग मुंडा यांच्या बाजूने जाहीर सभेत बोलत आहेत. या दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्याचे रघुवर दास सरकारच्या विकासातील कामगिरीचा पाढा मांडत पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस आणि झामुमोवर जोरदार हल्ला चढविला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मी भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायचो, तेव्हा मी करिया मुंडा’जी यांचे बोट धरून राजकारण शिकलो. करिया मुंडाबरोबर मला गाव पाहण्याची दृष्टी मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झारखंडच्या विकासासाठी काम करीत आहेत. पुढे मोदी म्हणाले की, मी बिरसा मुंडाच्या भूमीवर आलो आहे. टीना भगत कुटुंबातील लोक आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. महात्मा गांधींच्या विचारांना दुर्गम खेड्यात नेण्याचे काम टीना भगत कुटुंब करीत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x