22 September 2019 1:59 PM
अँप डाउनलोड

उत्तर प्रदेशात भाजपला झटका, पोटनिवडणुकीत पराभूत

लखनऊ : उत्तर प्रदेशात २ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला आणि योगी सरकारला चांगलाच झटका बसला आहे. राज्यात तब्बल २९ वर्षांनी विक्रम रचला गेला. सपा पुरस्कृत उमेदवार प्रवीण निषाद यांनी योगी सरकारची त्यांच्याच मतदार संघात झोप उडवली आहे.

फुलपुर लोकसभा पोटनिवडणुकीत सपा आणि बसपाच्या युतीने भाजप उमेदवाराचा पराभव केला तर गोरखपूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव जवळपास निश्चित होता.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील निवडून येणाऱ्या खासदारांचा आकडा हा देशाचा पंतप्रधान ठरवत असतो. परंतु भाजपला पोटनिवडणुकीतून मिळालेला झटका हा मोदी सरकारसाठी २०१९ मधील धोक्याचा इशारा मानला जात आहे.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Narendra Modi(980)#Yogi Government(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या