27 September 2020 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचे कारणच नाही | मुलाखतीपूर्वी फडणवीसांच्या राऊतांना अटी सामान्यांची लूट आणि राज्यातील मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही | मनसेकडून संताप सामान्यांची लूट आणि मंत्र्यांशी सेटलमेंट? राज्यातील १५ मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही खोट्या कागदपत्रांद्वारे ट्रॅफीक पोलिसांना फसवणं विसरा | तुमची सर्व कागदपत्रं पोलिसांकडे मुंबईतील महिलांसाठी आनंदाची बातमी | प. रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन सुरु होणार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री समविचारी पक्ष असल्याने युतीत निवडणूक लढवली | आता भाजपशी वैचारिक मतभेदांचा साक्षात्कार?
x

पुण्यात ऑक्सफर्डची लस घेणाऱ्या स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम | साइड इफेक्ट नाहीत

Oxford Coronavirus vaccine, Covishield, Volunteers normal

पुणे, २७ ऑगस्ट : ऑक्सफोर्ड कोविड-19 लसीच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या टप्प्यातील परिणाम नॉर्मल असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी (27 ऑगस्ट) दिली आहे. या चाचणीसाठी पुढे आलेल्या 2 स्वयंसेवकांपैकी दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. 32 आणि 48 वर्षीय दोन स्वयंसेवकांना कोविडशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. पुणे स्थित भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी या लसीचे उत्पादन केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, ऑक्सफर्डच्या करोना लशीची मानवी चाचणी करण्यासाठी पुढे आलेल्या दोन स्वयंसेवकांची तब्येत ही ठरवण्यात आलेल्या निकषांप्रमाणे चांगली असल्याची माहिती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुणे स्थित सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने बनवलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीचा ३२ आणि ४८ वर्ष वय असलेल्या दोन स्वयंसेवकांना पहिला डोस दिला. भारतात ऑक्सफर्डच्या लसीचे नाव ‘कोविशिल्ड’ आहे.

दोन्ही स्वयंसेवकांना एक महिन्यानंतर या लसीचा पुन्हा दुसरा डोस दिला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “कालपासून आमची वैद्यकीय टीम दोन्ही स्वयंसेवकांच्या संपर्कात आहे. दोघांचीही प्रकृती चांगली आहे. त्यांना कुठेही दुखत नाहीय किंवा ताप नाहीय” असे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे वैद्यकीय उपसंचालक डॉ. जितेंद्र ओस्वाल यांनी सांगितले.

बुधवारी लस दिल्यानंतर दोन्ही स्वयंसेवकांचे अर्धा तास परीक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी जाऊ दिले असे डॉक्टरांनी सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. काही गरज पडल्यास त्यांनी इमर्जन्सीमध्ये नंबर देण्यात आले आहेत तसेच आमचे वैद्यकीय पथकही त्यांच्या संपर्कात आहे असे डॉ. जितेंद्र ओस्वाल म्हणाले. काल पाच जणांवर लस चाचणी करण्यात येणार होती. पण तिघांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळून आल्या. त्यामुळे ते लस चाचणीसाठी अनफीट ठरले.

 

News English Summary: The first dose of Covishield vaccine, developed by Pune-based Serum Institute of India, was given to two volunteers aged 32 and 48. In India, the Oxford vaccine is called Covishield. Both volunteers will be given a second dose of the vaccine a month later, officials said.

News English Title: Oxford Coronavirus vaccine trial vital signs of volunteers normal says doctor News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x