16 December 2024 12:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

माझ्यावर ६ महिन्याची बंदी; पण मोदी एअर इंडियाला कायमची बंदी घालू शकतात: कुणाल कामरा

Arnab Goswami, Stand up Comedian Kunal Kamra, Indigo, Air India

मुंबई: पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात डिवचल्याचा व्हिडिओ टाकल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर इंडिगो कंपनीने सहा महिन्यांसाठी विमान प्रवासाची बंदी घातली. त्यानंतर एअर इंडियानेही कुणाल कामरावर विमान प्रवासाची बंदी घातली.

मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 5317 या विमानाने कॉमेडियन कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी प्रवास करत होते. कुणाल कामराने या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलं आणि समाज माध्यमांवर पोस्ट केलं. व्हिडिओत कुणाल कामरा हा गोस्वामी यांच्या पत्रकारितेवर टीका करताना “गोस्वामी भित्रट आहे असं म्हणताना स्पष्ट ऐकू येत आहे.

संबंधित व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट झाल्यानंतर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियातून कुणालवर कारवाई करावी अशी मागणी पुढे आली. त्यानंतर इंडिगो (Indigo) ने या प्रकरणाची दखल घेत सहा महिन्यांची बंदी घालण्याची कारवाई केली. कुणाल कामराची वर्तवणूक स्वीकारण्यासारखी नाही, असं इंडिगो एअरलाईन्सने स्पष्ट केलं. परंतु, कुणाल कामराने या प्रकरणावर इंडिगो एअरलाईन्सची खिल्ली उडवली आहे. ‘माझ्यावर सहा महिन्याची बंदी घालण्यासाठी धन्यवाद, प्रामाणिकपणे सांगू तर तुम्ही खूप दयाळू आहात. नरेंद्र मोदी हे एअर इंडियाला कायम बंदी घालू शकतात.’ असं कुणालने ट्वीट केलं आहे.

कुणाल कामराने आणखी एक ट्वीट करत फ्लाइटमधील इतर प्रवाशांची माफी मागितली होती. ट्विटरवर कुणालने लिहिलं आहे की, ‘एका व्यक्तीला सोडून इतर प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल मी त्यांची माफी मागतो.’ दरम्यान, याचबरोबर कुणालने हेदेखील म्हटलं आहे की, त्याने काहीच चुकीचं काम केलेलं नाही.

 

Web Title:  Stand up Comedian Kunal Kamra banned in Indigo Airlines and Air India after roasting on TV Anchor Arnab Goswami on Flight.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x