30 June 2022 7:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

Crime Patrol | काठी नगरपालिका सरकारी साहित्य चोरी प्रकरणी शुभेंदू अधिकारी आणि बंधूंवर गुन्हा दाखल

BJP leader Suvendu Adhikari

कोलकत्ता, ०६ जून | पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचा भाऊ सोमेंदू यांच्यावर काठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर नगरपालिकामधून सरकारी साहित्य चोरुन नेण्याचे आरोप लावण्यात आले आहे. हा गुन्हा काठी नगरपालिका प्रशासकीय मंडळाचे सदस्य रत्नदीप मन्ना यांनी 1 जून रोजी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

सोमेंदू अधिकारी हे काठी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत. दरम्यान, शुभेंदू अधिकारी हे तेच नेते आहेत, ज्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. शुभेंदू आधी तृणमूलमध्येच होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शुभेंदू अधिकारी आणि त्यांचा भाऊ सोमेंदू यांच्या सांगण्यावरुन 29 मे रोजी दुपारी 12.30 नगरपालिका कार्यालयाच्या गोदामाचे कुलूप जबरदस्तीने उघडले व त्यामधून सरकारी साहित्य चोरुन नेले. त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी चोरीच्या वेळी केंद्रीय सशस्त्र दलांचा देखील वापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

News English Summary: In West Bengal, a case has been registered against BJP leader Subhendu Adhikari and his brother Somendu at Kathi. He has been accused of stealing government materials from the municipality. The case was registered by Ratnadeep Manna, a member of the Kathi Municipal Administrative Board, at the police station on June 1.

News English Title: BJP leader Suvendu Adhikari brother accused of stealing relief material case filed in West Bengal news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x