29 April 2024 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

पेट्रोल-डीझेलच्या किमतीचा भडका | मुंबईत 101.30 तर परभणीत 103.61 रुपये प्रति लिटर

petrol diesel price

मुंबई, ०६ जून | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. आज या महिन्यात तिसऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. देशातील अनेक भागात पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. मुंबईत 101.30 तर परभणीत राज्यातील सर्वात जास्त 103.61 रुपये प्रति लिटरने पेट्रोल मिळत आहे. तसेच, देशात सर्वात महाग पेट्रोल श्रीगंगानगरमध्ये मिळ असून, तिथे एका लिटरसाठी 106.09 रुपये मोजावे लागत आहेत.

देशातील प्रमुख राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा भाव 100 रुपये/लिटर झाला आहे. तर, तेलंगाणामधील अनेक ठिकाणी एका लिटर पेट्रोलसाठी 100 किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

मे महीन्यात पेट्रोल-डीझेलच्या किमतीत 16 वेळा वाढ झाली. यादरम्यान, पेट्रोल 3.83 आणि डीझेल 3.88 रुपयांनी महागले. त्यापूर्वी, पेट्रोल 90.40 आणि डीझेल 80.73 रुपए/लिटर दराने मिळत होते. यावर्षी 1 जानेवारीला पेट्रोल 83.97 आणि डीझेल 74.12 रुपये/लिटर दराने मिळत होते. अवघ्या 5 महीन्यांच्या कालावधीत पेट्रोल 11.06 आणि डीझेल 11.83 रुपयांनी महागले.

 

News English Summary: Petrol diesel petrol diesel became expensive for the third time this month petrol in Mumbai news updates.

News English Title: Petrol diesel petrol diesel became expensive for the third time this month petrol in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x