11 December 2024 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा पार्ट 2 ची भाजपाला धास्ती, भाजपने विचारही केला नसेल अशी योजना उत्तर प्रदेशसाठी आखतंय काँग्रेस...

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra 2.0 | काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आपली बहुचर्चित भारत जोडो यात्रा काढणार आहेत. ही यात्रा गुजरातमधील पोरबंदरपासून सुरू होईल, तर त्रिपुरातील आगरतळापर्यंत चालेल. या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग उत्तर प्रदेशातही जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यूपीला कव्हर करण्यासाठी खास रणनीती आखण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत अखिलेश यादव आणि जयंत चौधरी असतील असं वृत्त आहे. पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक जिल्हे या यात्रेत समाविष्ट केले जाऊ शकतात. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला होता, ज्यात 3500 किलोमीटरहून अधिक पायपीट झाली होती. मात्र यूपीत काही दिवसच गेले. आता भारत जोडो पार्ट २ यात्रेत थेट युपीला टार्गेट केल्याने भाजपची धास्ती अधिक वाढण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यूपीत प्रवेश करतील तेव्हा प्रदेश कांग्रेस अध्यक्ष बृजलाल खबरी यांच्यासोबत इतर सहकारी पक्ष देखील उपस्थित असतील. ही यात्रा १५ ऑगस्ट किंवा २ ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बृजलाल खबरी म्हणाले की, उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना राज्याला अधिक वेळ देण्याची मागणी केली आहे. मार्ग आणि तारखा अद्याप निश्चित केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात राहुल यांनी गाझियाबाद, बागपत आणि शामली जिल्ह्यांचा दौरा केला होता.

सूत्रांच्या मते राहुल यांच्या भारत जोडो यात्रा 2.0 मध्ये ‘इंडिया’ आघाडीतील अनेक महत्त्वाच्या पक्षांचे नेतेही दिसू शकतात. राहुल यांच्या यात्रेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोदचे अध्यक्ष जयंत चौधरी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम उत्तर प्रदेशातील जागांवर रालोद-सपा युतीची नजर असून ते येथे भाजपला कडवी टक्कर देऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राहुल, अखिलेश, जयंत हे तिघेही सहारनपूर, बागपत, रामपूर, बरेली, बदायूं, अलिगड, देवरिया, महाराजगंज, गाझीपूर, आझमगड आणि कुशीनगर मध्ये INDIA च्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ही यात्रा या जिल्ह्यांतून जाणे अपेक्षित आहे.

विधानसभा निवडणुकीत राहुल, अखिलेश एकत्र येण्याची शक्यता
भारत जोडो यात्रा 2.0 मध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव पुन्हा एकदा यूपीमध्ये एकत्र दिसले तर ही पहिलीच वेळ नाही. खरं तर 2017 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि सपा ने युती करून निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला आणि भाजपने सरकार स्थापन केले. त्यावेळी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली होती. राहुल आणि अखिलेश यांना टॅगलाइनही देण्यात आली होती, “यूपीला हे एकत्र आवडते. सपाला केवळ ४७ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ सात जागा जिंकता आल्या होत्या. यानंतर अखिलेश यांनी भविष्यात काँग्रेससोबत आघाडी न करण्याबाबतही भाष्य केले. पण भारत जोडो यात्रा आणि विरोधी आघाडी ‘इंडिया’ स्थापन झाल्यापासून यूपीत काँग्रेस, रालोद आणि सपाच्या आघाडीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे आहे. भाजपलाही ‘अँटी इन्कबंसी’चा जबर फटका बसण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांचा दारुण पराभव होईल असं म्हटलं जातंय.

News Title : Bharat Jodo Yatra in focus check details on 28 July 2023.

हॅशटॅग्स

Bharat Jodo Yatra(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x