13 December 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

IND vs NZ 2nd Day : सर्व भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो दुसऱ्या दिवशी सुरूच

India Tour of New Zealand 2020 second Test

ख्राइस्टचर्च: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला २३५ धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला ७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय डावाची अक्षरशः घसरगुंडी उडाली. ट्रेंट बोल्ट आणि इतर न्यूझीलंड गोलंदाजांच्या भन्नाट माऱ्यासमोर टीम इंडियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताची अवस्था ६ बाद ९० अशी झालेली असून सध्या संघाकडे ९७ धावांची आघाडी आहे. हनुमा विहारी आणि ऋषभ पंत हे फलंदाज सध्या खेळपट्टीवर असून तिसऱ्या दिवशी हे फलंदाज भारताची आघाडी कितीने वाढवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुसऱ्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारतानं पहिली विकेट गमावली. मयंक अग्रवाल केवळ ३ धावा करत माघारी गेला. त्यामुळं या डावातही सलामीवीरांना चांगली खेळी करता आली नाही. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सलग चौथ्या डावात विराट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर भारतीय फलंदाजांची एकामागोमाग एक रांग लावली. कोहलीनंतर लगेचच अजिंक्य रहाणे 9 धावांवर, पुजारा २४ तर उमेश यादव एक धाव करत माघारी परतला.

याआधी न्यूझीलंडच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी केली. पहिल्या दोन सेशनमध्ये बुमराह, शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज टिकू शकले नाही. मात्र कॉलिन डी-ग्रँडहोम आणि कायल जॅमिसन यांनी भारतीय गोलंदाजांना रडवलं. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत न्यूझीलंडला चांगल्या स्थितीत पोहचवले. याआधी कायलने 5 विकेट घेत भारतीय फलंदाजाचे कंबरडे मोडले होते. तर, फलंदाजीमध्ये त्यानं 49 धावांची खेळी केली. त्यामुळं दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने 235 धावांपर्यंत मजल मारली. तळाच्या फलंदाजांमुळे चांगली गोलंदाजी करूनही भारताला केवळ 7 धावांची आघाडी मिळाली आहे.

 

News English Summery: In the second innings of the second Test, the Indian batsmen once again performed well. India’s second day ended at 90-6. In just 90 runs, India have taken a lead of 97 runs losing 6 wickets. Currently, Hanuma Vihari (5) and Rishabh Pant (1) are batting. Meanwhile, skipper Virat Kohli failed again in the second innings, losing 14 runs. India lost their first wicket in the second over of the second innings. Mayank Agarwal returned with only 3 runs. Due to that, the openers could not do well in this innings. Then Cheteshwar Pujara and Virat Kohli tried to make India’s innings. But Virat failed to make a big run in the fourth inning. Then the Indian batsmen made a line after line. Immediately after Kohli, Ajinkya Rahane scored 9 runs, Pujara 24 and Umesh Yadav returned one run.

 

Web News Title: Story India Tour of New Zealand 2020 second Test day 2 Christchurch live.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x