27 July 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला IPO GMP | स्वस्त IPO आला रे! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल 100% परतावा
x

शिंदेंची प्रतिशिवसेना | स्वतः झाले मुख्य नेते आणि मूळ शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख पदाला त्यांनी हात लावलेला नाही. मात्र शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यात आली आहे. तर आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. एवढंच नाही तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला :
दरम्यान शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आता तर खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे.

उपनेतेपदी कोणाची वर्णी :
उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, विजय नहाटा आणि शिवाजीराव अढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे असं काहीतरी पाऊल उचलणार हे स्पष्टच झालं होतं. अशात आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिशिवसेनाच स्थापन केली आहे. २१ जून रोजी त्यांनी जे बंड पुकारलं होतं त्यानंतर घडलेल्या घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या आहेतच. अशातच रामदास कदम यांनी आज नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता तेही शिंदे गटात आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde step of dismissing-the Shivsena old national leaders check details 18 July 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x