4 December 2022 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Horoscope Today | 04 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

राज्याच्या तिजोरीत महसूल येण्यासाठी सरकारकडे वाईन शॉपचा पर्याय - राज ठाकरे

Covid 19, Corona Crisis, CM Uddhav Thackeray, Raj Thackeray

मुंबई, २३ एप्रिल: ‘राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळं कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ‘दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे.

‘महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल, अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेच लागतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आवाहन…’, असं लिहित ठाकरे यांनी ट्विट करत या आवाहनपर पत्राची प्रत जोडली. ज्यामध्ये त्यांनी हॉटेल उद्योगांपासून वाईन शॉप्स उघडण्यापर्यंतच्या गोष्टींचा उल्लेख केल्याचं स्पष्ट झालं.

आर्थिक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी दारूच्या उत्पादन व विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाकडं सरकारचं लक्ष वेधलं आहे. ‘राज्यातील पेट्रोलपंप आज जवळपास बंद आहेत. जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत. दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. यावरून सरकारला होत असलेल्या व होऊ शकणाऱ्या महसुली तोट्याचा विचार व्हायला हवा. टाळेबंदी आणखी किती दिवस चालेल याची खात्री नाही. त्यामुळं राज्याच्या महसुलासाठी सरकारनं वाइन शॉप उघडण्याचा विचार करावा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुंबईसारख्या शहरांमध्ये हॉटेल ही चैन राहिली नसून गरज झाली आहे. त्यामुळेच आता सरकारने हॉटेल सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे असल्याचे राज यांनी म्हटलं आहे. “आज गेले ३५ दिवस महाराष्ट्रातील उपहारगृह आणि रेस्टोरंटस पूर्णपणे ठप्प आहेत. याचा फटका जसा हॉटेल व्यवसायिकांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना बसला आहे, तसा सामान्यांना देखील बसला आहे. आज मुंबई आणि इतर शहरामध्ये ‘हॉटेल’ ही काही चैनीची गोष्ट राहिली नाही, तर गरज बनली आहे. अनेक छोटी हॉटेल्स आहेत, ‘पोळी-भाजी’ केंद्र आहेत, जिथे अगदी माफक दरात ‘राईसप्लेट’ मिळते. अशा हॉटलेस्ची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचे आहे. ह्या छोट्या खानावळींची आणि हॉटेल्सची संख्या प्रचंड आहे. कारण ह्या माफकत दरात मिळणाऱ्या ‘राईसप्लेट्स’वर राज्यातील मोठी लोकसंख्या अवलंबून आहे.

अनेकांच्या घरात जेवण बनवणारी व्यक्ती नसेल किंवा पुरेशी साधनसामुग्री पण नसेल, त्यांचा विचार आता सरकारने केला पाहिजे. हे वास्तव सरकारने स्वीकारलंच पाहिजे. करोनाचा संसर्ग रोखला जावा ह्यासाठी शारीरिक अंतर राखणं गरजेचं आहे हे मान्य आहे, पण ह्या हॉटेल्समधील पार्सल सेवा सुरु करायला काय हरकत आहे? अर्थात पार्सल सेवेची सौय करताना ग्राहकांमध्ये पुरेसं शारीरिक अंतर राखलं जातंय आणि योग्य स्वच्छता राखली जात आहे हे बघणं हे हॉटेल मालकांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते बजावलंच पाहिजे. यातून पार मृत झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्शेत काही प्रमाणात धुगधुगी तरी निर्माण होईल,” अशी अपेक्षा राज यांनी या पत्रामध्ये व्यक्त केली आहे.

 

News English Summary: ‘The economic situation of the state is dire at present. There is no money to pay the salaries of the employees. Therefore, the government should consider starting the flow of revenue now. It can be prescribed by continuing wine shops. Therefore, the state government should take such a decision without getting involved in any moral issue, ‘demanded MNS president Raj Thackeray. “I do not mean to say that drinkers should be considered,” he said.

News English Title: Story corona crisis MNS Chief Raj Thackeray wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray about economy of state News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x