19 October 2021 9:10 AM
अँप डाउनलोड

कोल्हापूरबाबत ‘तसं’ मी झोपेतही बोलू शकत नाही : चंद्रकांत पाटील

BJP State President Chandrakant Patil, Kolhapur, Whatsapp, Social Media

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये युतीच्या झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषद रविवारी घेतली होती. यावेळी एका वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांना समाज माध्यमांवर ट्रोल केलं गेलं. कोल्हापूरबद्दल केलेल्या त्या विधानाची चर्चा सर्वत्र सुरू होती. आता त्यावर चंद्रकांत दादांनी एक व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकार परिषदेत मी व्हॉटसअपवर आलेले मेसेज वाचून दाखवले. जो मेसेज वाचून दाखवला त्यामध्ये शेवटचं वाक्यही होतं. त्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा अपमान होईल असं वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नााही असं त्यांनी म्हटलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, त्यावर स्वतः चंद्रकांत पाटील यांनी समाज माध्यमांवर माझी बदनामी करण्यात येत असल्याचं म्हटलं असून कोल्हापूरबाबत तसं वाक्य मी झोपेतही उच्चारु शकत नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. “पत्रकार परिषदेत मी व्हॉट्स अ‍पवर आलेला मेसेज वाचून दाखवला. त्यातल्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा उपमर्द करणारं वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारु शकणार नाही”, असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं आहे. “कोल्हापुरातील महायुतीच्या पराभवाची कारणे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात मी व्हॉट्सअ‍पवरील एका मेसेजचा संदर्भ दिल होता. पण, त्या मेसेजमधील शेवटच्या वाक्याशी मी कदापीही सहमत नाही. या एका वाक्यावरून माझी समाज माध्यमांवर बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे”.

यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून पत्रकार परिषदेतल्या व्हॉट्सअ‍प मेसेज आणि त्यातल्या शेवटच्या ओळीबद्दल स्पष्टीकरण दिलं. ‘मागील ५ वर्षात काय करायचं राहिलं, हे आम्ही जनतेला विचारलं आहे. मी व्हॉट्सअ‍प मेसेज पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. टोल आम्ही घालवला, विमानतळ सुरु केलं. मी त्या मेसेजमधले सकारात्मक मुद्दे मांडले. त्या मेसेजच्या शेवटी जे वाक्य होतं, त्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेच्या मनात माझ्याबद्दल विश्वास आहे. शेवटच्या वाक्यावरुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कोल्हापूरच्या जनतेचा उपमर्द करणारं वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारु शकणार नाही,’

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x