28 September 2020 8:18 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्रातील सत्तेचे रिमोट कंट्रोल आता उद्धव यांच्या हाती: शिवसेनेचा इशारा

Sanjay Raut, Shivsena, Saamana Dainik, Uddhav Thackeray

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तेचे रिमोट कंट्रोल आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असल्याचे शिवसेनेने रविवारी सांगितले. २०१४च्या तुलनेत यावेळी विधानसभेत कमी जागा मिळून देखील शिवसेनेने हा दावा केला आहे. १९९५ ते १९९९ या सत्ता काळात शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळ ठाकरे हे सहसा ‘रिमोट कंट्रोल’ हा शब्द वापरत असत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘शिवसेनेने यावेळी कमी जागा जिंकल्या आहेत. २०१४मध्ये ६३च्या तुलनेत यावेळी ५६ जागा जिंकल्या आहेत, परंतु त्यानंतर सत्तेची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे.

त्याचबरोबर, शिवसेनेने शनिवारी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपाकडे महाराष्ट्रात ‘समान जागा वाटप’ अंमलात आणण्याचे लेखी आश्वासन मागितले होते. काल उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत निवासस्थानी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी बैठक पार पडली. यावेळी आमदारांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या मागणीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.” पुढे पाटील म्हणाले की, सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी भाजपाचे नवनिर्वाचित आमदार ३० ऑक्टोबरला मुंबईत बैठक घेतील, असे पत्रकारांना सांगितले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(136)#Shivsena(925)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x