29 March 2024 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण

India corona pandemic

वॉशिंग्टन, १४ मे | कोरोना महामारी येऊन एक वर्षा लोटले आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, पण यातील अनेकांच्या मृत्यूची सरकारी आकडेवारीत नोंदच झालेली नाही. असे यामुळे, कारण अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इंस्टीट्यूटच्या विश्लेषणात करण्यात आला आहे. यात सांगितल्यानुसार, रशियात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी सरकारी आकडेवारीपेक्षा 5 पट जास्त आहे. तसेच, भारत आणि मेक्सिकोमध्येही सरकारी आकडेवारीपेक्षा 2 पट जास्त मृत्यू झाले आहेत. तर संपूर्ण, जगात सरकारी आकडेवारीपेक्षा 113% जास्त मृत्यू झाले आहेत.

अभ्यासकांनी आपला दावा सिद्ध करण्यासाठी काही बाजू मांडल्या आहेत:

  1. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कमी सांगितली, खासकरुन त्या भागात, जिथे मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या नाहीत.
  2. कोरोना रुग्णांसाठी आरोग्य व्यवस्थेचा योग्य वापर झाला नाही.
  3. चिंता आणि नैराश्येतून बर्‍याच रुग्णांनी आत्महत्या केल्याचे ठाम पुरावे मिळाले, पण यांची कोरोना मृतांमध्ये नोंद नाही.
  4. इन्फ्लूएंजा, निमोनिया किंवा श्वासामुळे मृत्यू कमी झाले, पण संक्रमणामुळे वाढले.
  5. हृदय रोग किंवा श्वसनासंबंधी आजारामुळे मृत्यू झाले, पण यांची सरकारी आकडेवारीत नोंद नाही.
  6. घरी किंवा हॉस्पिटलच्या बाहेर झालेल्या मृत्यूची सरकारी आकड्यात नोंद झाली नाही.
  7. चाचण्या कमी केल्यानेही अनेक मृत्यू झाले, त्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेच नाही.

दरम्यान, देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. गुरुवारी देशभरात 3 लाख 42 हजार 896 कोरोना संक्रमित आढळले, तर 3 लाख 44 हजार 570 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच, 3,997 रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. 4 दिवसापूर्वी, 10 मे रोजी 3.29 लाख नवीन रुग्ण आढळले होते, तर 3.55 लाख संक्रमित ठीक झाले होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त अॅक्टीव्ह केस, म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 9 मे रोजी 37.41 लाख होती. ती आता कमी होऊन 37 लाख झाली आहे. गुरुवारी यात 5,753 घट झाली. दरम्यान, देशात ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा 2 कोटींच्या पुढे गेला आहे.

 

News English Summary: An analysis by the Health Metrics and Evaluation Institute at the University of Washington claims that many large countries have hidden the true death toll from the world. According to it, the number of deaths due to corona in Russia is 5 times higher than the official figures. Also, India and Mexico also have 2 times more deaths than government figures. On the whole, there are 113% more deaths worldwide than government figures.

News English Title: Few countries has hide actual numbers of covid death news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x