12 December 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

राफेलने चीनला काहीही फरक पडणार नाही, ते आपल्यापेक्षा खुप पुढे आहेत - शरद पवार

NCP Leader Sharad Pawar, Rafale fighter jet, A Game Changer

नवी दिल्ली, २९ जुलै : आज लढाऊ राफेल विमान भारतात दाखल होणार आहे. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया या विमानांच्या स्वागतासाठी हजर राहणार आहेत. आज म्हणजेच बुधवारी सकाळी 11 वाजता अबु धाबीवरुन राफेलचं उड्डाण होणार असून दुपारी जवळपास 2 वाजता, पाच राफेल विमान हरियाणातील अंबाला एअर बेसवर पोहचणार आहेत. अंबाला विमानतळ आणि आसपासच्या परिसरातील अनेक भागात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

अंबाला एअरफोर्स स्टेशन राफेलचं पहिलं स्क्वाड्रन बनवण्यात आलं आहे. राफेल फायटर जेटसाठी अंबाला जिल्हा प्रशासनाने एअरबेसपासून जवळपास 3 किलोमीटरच्या परिसरात कलम 144 लागू केला आहे. त्याशिवाय एअरबेसजवळ ड्रोन उडवण्यास आणि फोटोग्राफीसाठीही बंदी आहे.

दरम्यान, “भारतानं हवाई दलात राफेल विमानं सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

“आपण नक्कीच चीनसोबत असलेल्या तणावावर गंभींरपणे विचार करत आहोत. राफेलच्या येण्यानं चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप म्हणजे खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही,” असं शरद पवार यावेळी म्हणाले. “जर भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्यानं चीनला त्याची काळजी वाटेल असं मला वाटत नाही. भारतानं राफेल हवाई दलात सामावून घेतलं आहे हे चांगलं आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. पण ते गेमचेंजर ठरेल असं वाटत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: It is certainly a good thing that India has added Raphael aircraft to its air force. Joining Raphael’s fleet will definitely increase the strength of the Air Force. But it will not be a game changer, said NCP President Sharad Pawar.

News English Title: NCP Leader Sharad Pawar Commented Rafale fighter jet Wont Be A Game Changer Spacial Interview News latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x