23 April 2024 9:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

केसीआर आणि जगनमोहन रेड्डी हे मोदींचे पाळीव कुत्रे : चंद्राबाबू

Narendra Modi, BJP, Chandrababu Naidu, Jagan Reddy

कृष्णा : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी प्रचाराची धार विखारी होताना दिसत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर कठोर शब्दात निशाणा साधत वादग्रस्त विधान केले आहे. जगनमोहन रेड्डी आणि के. चंद्रशेखर राव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाळीव कुत्रे असल्याचे एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.

मचिलीपटनम येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एका जाहीर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एन. चंद्राबाबू म्हणाले, “जगनमोहन रेड्डी कुत्र्याची बिस्किटे खात आहेत. तिच बिस्किटे आपल्याला वाटत आहेत. जगनमोहन आणि केसीआर मोदींचे पाळीव कुत्रे आहेत, जे एका बिस्किटासाठी आपले गुडघे टेकून बसतील. सावध राहा, जगनमोहन हे बिस्किट तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करतील.”

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. येत्या ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

हॅशटॅग्स

#Chandra Babu Naidu(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x