20 August 2022 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
x

मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं : राष्ट्रपती भवन

नवी दिल्ली : भारताच्या राष्टपतीभवनाच सौंदर्य वाढवणार मुघल गार्डन आज सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं. या मुघल गार्डनच्या सफारीचा आनंद ९ मार्च पर्यंत सकाळी ९.३. ते दुपारी ४ वाजेपर्यंत जनतेला अनुभवता येणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारीच या उद्यानोत्सवाचं उद्घाटन केलं.

केवळ २ मार्च रोजी होळी निमित्त हे गार्डन बंद असणार आहे. परंतु हा आनंद पर्यटकांना जवळजवळ महिनाभर अनुभवता येणार आहे. मुघल गार्डन हे रंगीबिरंगी फुलांसाठी प्रसिध्द असून, तेथील विविध फुलांच्या जाती या पर्यटकांच्या डोळ्याचं पारणं फेडनारी असतात. ९ मार्च ला अंध-अपंगांसाठी, लष्करातील जवान तसेच शेतकरी यांना मुघल गार्डनची सफर घडवली जाणार आहे.

मुघल गार्डनमध्ये जाताना प्लास्टिकच्या पिशव्या, सुटकेस, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि इतर साहित्य गार्डनमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Mughal Garden(1)#Rashtrapati Bhavan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x