25 September 2022 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यातील तरुणांचा रोजगाराचा मुद्दा गंभीर होऊ लागताच शिंदे गटाकडून धामिर्क मुद्द्यांवर भर, 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा रोजगार निर्माण करणार? Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत Horoscope Today | 25 सप्टेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 25 सप्टेंबर, रविवारसाठी तुमचा लकी नंबर आणि काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र
x

त्या व्हिडिओ ने खळबळ: डेसॉल्टचे अध्यक्ष बोलले, राफेलसाठी एचएएल'सोबत करार जवळपास झाला होता

पॅरिस : २५ मार्च २०१५ म्हणजे नरेंद्र मोदींच्या फ्रान्स भेटीच्या (१० एप्रिल २०१५) केवळ १५ दिवस आधी फ्रान्समध्ये मिराज-२००० या लढाऊ विमानांच्या हस्तांतराचा कार्यक्रम फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला होता. डेसॉल्ट एव्हिएशन आयोजित या कार्यक्रमात म्हणजे मोदींनी राफेल बाबत नवीन करार अंमलात आणण्यापूर्वी जे घडलं होत, त्याचे अनेक खुलासे आणि वास्तव समोर आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा व्हिडिओ डेसॉल्ट एव्हिएशनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल’वरीलच आहे. दरम्यान या कार्यक्रमात मिराज-२००० लढाऊ विमानांच्या हस्तांतरानंतर भारत सरकार आणि भारतीय वायू दल पुढच्या नव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या बांधणीत म्हणजे राफेलच्या करारात उतरणार होत. त्यात एचएएल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच नाव जवळपास निश्चित झालं होत, असं या व्हिडिओमधून समोर येत आहे.

फ्रान्समध्ये मिराज-२००० या लढाऊ विमानांच्या हस्तांतराचा कार्यक्रमाला त्यावेळी डेसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपिअर, भारतीय वायुसेना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. पूर्वीची मिराज-२००० लढाऊ विमानं आणि आता राफेल लढाऊ विमानं बनवणाऱ्या फ्रान्सस्थीत कंपनी अर्थात “डेसॉल्ट एव्हिएशन”चे सीईओ एरिक ट्रॅपिअर यांच्या भाषणात थेट राफेल आणि त्यासाठी एचएलएल अर्थात संरक्षण क्षेत्रातील साहित्य आणि विमानं बनविण्याचा ५० वर्षाहून अधिक काळाचा अनुभव असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार जवळपास निश्चित झाला होता, असं त्यांच्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट खुलासा होत आहे.

उपस्थितांना संबोधित करताना डेसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपिअर यांनी २५ मार्च २०१५ रोजी, म्हणजे नरेंद्र मोदींच्या फ्रांस भेटीच्या (१० एप्रिल २०१५) केवळ १५ दिवस आधी असं स्पष्ट म्हटलं होत की,’बरीच चर्चा झाल्यानंतर, आणि भारतीय वायुसेनाच्या एका प्रमुखांकडून भविष्यातील सर्व गरजा समजून घेतल्यानंतर हे निश्चित करू शकलो की भविष्याचा विचार करून राफेल सारखी आधुनिक लढाऊ विमानं भारतीय वायुदलाला हवी आहेत. तसेच एचएएल’च्या चेअरमन सोबत आमचं त्या जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी आरएफपी’वर (प्रस्तावासाठी विनंती) एकमत झालं असून आम्ही एकमेकांशी सहमत आहोत. मला विश्वास आहे राफेल संबंधित करार लवकरच पूर्ण होईल आणि करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील.’ असं ते बोलत आहेत.

काय आहे नेमका तो व्हिडिओ?

याचाच अर्थ डॉ. मनमोहन सिंग सरकारकडून संरक्षण क्षेत्रातील अनुभवी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच नाव निश्चित झालं होत, ज्यामध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स लिमिटेडचा उल्लेख डेसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपिअर यांच्या संपूर्ण भाषणात कुठेही नाही. परंतु हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा ते स्पष्ट उल्लेख करत आहेत. त्यानंतर म्हणजे या डेसॉल्ट एव्हिएशन कंपनीच्या कार्यक्रमाच्या नंतर नरेंद्र मोदी १० एप्रिल २०१५ रोजी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आणि असं काय घडलं की जुना राफेल करार मोडीत निघाला आणि अचानक नवख्या रिलायन्स डिफेन्स लिमिटेडची डेसॉल्ट एव्हिएशनने निवड केली? कारण सरकारी रेकॉर्ड प्रमाणे या अनिल अंबानींच्या कंपनीची स्थापन २८ मार्च २०१५ मध्ये आणि ठीक १० एप्रिल २०१५ रोजी मोदी राफेलचा नवा करार करण्यासाठी फ्रान्सला रवाना झाले?

त्यामुळे थेट फ्रान्समधूनच उपलब्ध होणारी अधिकृत माहिती आणि त्यानंतरचा तसेच त्या आधीच घटनाक्रम नक्कीच मोदी सरकारवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे का? आणि काँग्रेसला योग्य ठरवत आहे असं एकूण चित्र आहे. काँग्रेसने सुद्धा हाच अधिकृत व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामुळे भाजपची बोलती बंद झाली आहे.

अनिल अंबानींच्या कंपनीच्या नोंदणीच्या तारखा मिनिष्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स वरील रेकॉर्ड प्रमाणे आम्ही खाली दाखवत आहोत.

व्हिडिओ: मोदींच्या रशिया दौऱ्यात सुद्धा उद्योगपतींमध्ये अनिल अंबानी रशियन प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी कसे होते….तिथे सुद्धा संरक्षण खात्यासंबंधित करार होणार होते!

२०१७ मध्ये नागपूरमधील मिहान मध्ये जेव्हा “दसॉ रिलायंस एरोस्पेस लिमिटेड” च्या प्रकल्पाचा उदघाटन सोहळा झाला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल अंबानींवर इंग्लिशमध्ये खूप स्तुती सुमन उधळली होती. काय म्हटले होते मुख्यमंत्री या समारंभात?

अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी यांच्या या गोड नात्याची सुरुवात २०१३ मध्ये व्हायब्रण्ट गुजरातमध्ये झाली होती. त्यात अनिल अंबानींनी मोदींना थेट अर्जुनाची उपमा दिली होती. इतकंच नाही तर भाषणाच्या शेवटी अनिल अंबानी यांनी सर्व उपस्थित उद्योगपतींना उभं राहण्याची विनंती करत मोदींची टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करायला सांगितली होती.

व्हिडिओ: काय म्हटले होते अनिल अंबानी व्हायब्रण्ट गुजरात मधील भाषणात?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1660)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x