27 July 2024 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

गुवाहाटीतून शिंदेंची राष्ट्रवादीच्या नावाने बोंबाबोंब, पण मंत्रिमंडळ विस्तारात मूळ शिवसैनिकांना डावलून काँग्रेस-राष्ट्र्वादीतील आयतांना संधी

Deepak Kesarkar]

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.

राज्यभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. तब्बल महिनाभर लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, शपथविधीने चित्र स्पष्ट झालं असून, मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना डच्चू मिळाला आहे.

या शपथविधी सोहळ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली. तिसरा क्रमांक हा चंद्रकांत पाटील यांचा लागला आहे. पाटील यांनीही इश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली. त्यानंतर विजय कुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे संकटमोचक आणि फडणवीस यांचे खास असलेले गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. सहाव्या क्रमांकावर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. त्यानंतर दादा भुसे यांनी शपथ घेतली.

शिंदेंकडून मूळ राष्ट्रवादीतील नेत्यांना प्रथम न्याय :
सावंतवाडी नगरपालिकेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून केसरकर यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते नगराध्यक्ष झाले. मूळचे राष्ट्रवादीच्या गोटातील असलेलं तत्कालीन आमदार दीपक केसरकर यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. सावंतवाडी मतदारसंघातून तीन वेळा निवडून येण्याची हॅट्रिक त्यांनी साधली आहे. सेना-भाजप युती सरकारमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला. तसेच २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणारे उदय सामंत यांना पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपद देऊन जुन्या शिवसैनिक आमदारांना नारळ दिला आहे. तर २०१९ मध्ये आयत्यावेळी शिवसेनेत प्रवेश करणारे अब्दुल सत्तार यांना पहिल्याच फेरीत संधी दिली आहे.

त्यामुळे बंड पुकारल्यापासून राष्ट्रवादीवर निशाणा साधणारे आणि राष्ट्रवादीला कारणीभूत ठरवणारे एकनाथ शिंदे यांचा राजकीय चेहरा उघडा पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. वरून शिंदेंना समाज माध्यमांवर देखील प्रचंड टीकेचा सामना करावा लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Deepak Kesarkar and Udaya Samant got opportunity in cabinet check details 09 August 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)#Deepak Kesarkar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x