12 December 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Gautam Adani | बिग ब्रेकिंग! INDIA आघाडीची सत्ता आल्यास अदानींची चौकशी होणार, 32,000 कोटीची चोरी केल्याचा राहुल गांधींचा आरोप

Gautam Adani

Gautam Adani | उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर एका परदेशी वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत उद्योग समूहाच्या प्रमुखाने ३२ हजार कोटी रुपयांची ‘चोरी’ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काय आरोप आहेत
अदानी समूह चुकीची किंमत दाखवून अधिक पैसे आकारत असल्याचा आरोप राहुल यांनी फायनान्शियल टाइम्स वृत्तपत्रात केला आहे. अदानी इंडोनेशियात कोळसा विकत घेतात आणि तो कोळसा भारतात पोहोचेपर्यंत त्याचे दर बदलतात. ते दुप्पट होते. अशापरिस्थितीत अदानींनी जनतेच्या खिशातून सुमारे १२ हजार कोटी रुपये काढले आहेत. कसे काय? कोळशाचे दर चुकीचे दाखवून येथील विजेचे दर वाढवून. यापूर्वी राहुल यांनी अदानी समूहावर २० हजार कोटी रुपयांची चोरी केल्याचा आरोप केला होता.

सरकार स्थापन झाल्यास अदानी व्यवसाय करू शकतील का?
बुधवारी पत्रकार परिषदेत INDIA आघाडीची सत्ता आल्यास अदानी व्यवसाय करू शकतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. सरकार त्यांची चौकशी करणार का? यावर खासदार राहुल गांधी म्हणाले, ‘नक्कीच चौकशी होईल. हा विषय केवळ अदाणींचा नाही, जर कोणी देशातील जनतेच्या ३२ हजार कोटींची चोरी केली तर त्याची चौकशी केली जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gautam Adani financial times report congress leader Rahul Gandhi statement 18 October 2023.

हॅशटॅग्स

Gautam adani(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x