5 May 2024 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मराठा क्रांती मोर्चाबाबत संभाजीराजेंच्या 'राजकीय' भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित, संभाजीराजेंविरोधात मराठा समन्वयक आक्रमक

Maratha Kranti Morcha

Maratha Kranti Morcha | राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितले. यादरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे आभार मानले आहेत. आपल्या लढ्याला यश आल्याचेही राजेंनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

सर्व उमेदवार मात्र वेळोवेळी मला भेटून त्यांच्या व्यथा सांगत होते. अपेक्षा व्यक्त करीत होते. शेवटी सरकारला जागे करण्यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये आझाद मैदान येथे मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो. यावेळी, राज्य सरकार सोबत समन्वयकांची बैठक झाली असता, नियुक्त्यांच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चालढकल करीत होते असं ते म्हणाले.

छत्रपती संभाजीराजेंविरोधात ‘मराठा’ आक्रमक :
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून दमदाटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण आता तापणार असल्याचे दिसत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा चालू असतानाच मुंबईतील बैठकीत संभाजी राजे यांनी दमदाटी केल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी चाललेल्या या क्रांती मोर्चाच्या भूमिकेकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

संभाजीराजेनी बैठकीत बोलू देत नाहीत :
मराठा समाजाच्या अनेक मागण्य सरकार दरबारी मांडण्याचे काम सुरु असतानाच हा वाद आता उफाळून आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाच्या मागण्याबाबत चर्चा चालू असताना संभाजीराजे यांनी या बैठकीत काही बोलू दिले नाही असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात आला आहे.

समन्वयक एकवटले :
मराठा क्रांती मोर्चाबाबत संभाजीराजेंच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुंबईतील बैठकीत संभाजीराजेंनी कुणी काही बोलले तर बैठकीतून निघून जाण्याची धमकी दिली होती असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे हे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या दरी निर्माण झाल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. त्यामुळे संभाजी राजे यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एकवटले असल्याचे दिसत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maratha Kranti Morcha allegations on Chhatrapati Sambhajiraje check details 26 August 2022.

हॅशटॅग्स

#ChhatrapatiSambhajiMaharaj(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x