19 April 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

त्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळायचा नसेल | म्हणून मुद्दाम मास्क घालत नसतील - आठवले

Ramdas Athawale, Raj Thackeray, Mask

मुंबई, ०८ मार्च: राज ठाकरे विनामास्क प्रवास करतात, हे अनेकदा समोर आलंय. आजही त्यांनी नाशिक दौऱ्यात मास्क परिधान केलेलं नव्हतं. तसंच नाशिकचे माजी महापौर मुर्तडक यांनाही राज ठाकरे यांनी चेहऱ्यावरील मास्क काढण्याची सूचना केली. त्यामुळे राज ठाकरेंचा ‘विना मास्क इशारा’ चर्चिला जात आहे.

मास्क हीच खरी लस आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे. राज ठाकरेंनी मास्क का वापरायचा नाही, याचं एकदा ठोस कारण सांगावं, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलंय.

त्यानंतर याच विषयाला अनुसरून रामदास आठवले यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे. राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सातारा येथे रामदास आठवलेंची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले.

 

News English Summary: After that, Ramdas Athavale asked a question on the same subject. Reacting to this, Athavale said that action should be taken against the leader in the same manner as it is against ordinary people who do not wear masks in the state. Raj Thackeray’s orders given by the government should be followed. But Raj Thackeray may not want to follow the orders of Chief Minister Uddhav Thackeray. Therefore, they may not be wearing masks on purpose, said Ramdas Athavale. A press conference of Ramdas Athavale was held at Satara. At this time, Ramdas Athavale answered the question of not wearing Raj Thackeray’s mask.

News English Title: Ramdas Athawale talked on Raj Thackeray not using Mask in public place news updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x