24 September 2020 10:57 PM
अँप डाउनलोड

हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अजित पवारांची बापटांवर टीका

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मंत्र्यांवर सडकून टीका केली. हे असले मंत्री या वयात काय बोलावे ते कळत नाही अशा आमदाराला येथून निवडून दिले आहे. हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर कसबा विधानसभा मतदारसंघातीळ राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गिरीश बापट आमदार असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी येथे राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला होता. उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा एकमेकांवर स्तुतीसुमन उधळत मागील रुसवे फुगवे बाजूला सारत एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये होकारात्मक संदेश देण्यात आला. हा जमलेला जनसमुदाय पाहून पालकमंत्री गिरीश बापट यांची झोप उडेल असं वंदना चव्हाण उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या.

अजित पवार यांनी सुद्धा भाषणादरम्यान गिरीश बापट यांना चांगलच फैलावर घेतलं. त्यांच्यावर बोचरी टीका करताना अजित पवार म्हणाले की, या वयात काय बोलावे ते कळत नाही अशा आमदाराला येथून निवडून दिले आहे. भाजपच्या पुणे महापालिकेतील कारभारावर अजित पवारांनी तुफान टीका केली. पुणे महापालिकेतील भाजप तोडपाणी करतात, तसेच बाजपचे आताचे मंत्री मला विचारतात, अजित दादा हे अधिकारी जसं तुमचं ऐकायचे तस आमचे ऐकत नाहीत. तुम्ही असं काय करायचे की ज्यामुळे सरकारी प्रशासकीय अधिकारी तुमचेएकायचे?. मी त्यांना सांगायची की, त्याला धमक लागते. परंतु आताचे राज्यकर्ते दुपारी झोपतात. सध्याच्या मंत्र्यांचे कोणी ऐकत नाही,“अशी टीका त्यांनी केली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(119)#NCP(302)BJP(421)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x