12 December 2024 6:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

मराठा समाजाचा ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद, तर केस व नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका: नितेश राणे

औरंगाबाद : समस्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजे क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधित मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूर येथे पार पडली असता हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच कार्यकर्त्यांना राज्यभर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्ट २०१६ रोजी औरंगाबादमधून मराठा क्रांती मूक मोर्चास राज्यभर सुरवात झाली होती. त्यामुळे या तारखेचे औचित्य साधून त्याच दिवशी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अली आहे.

औरंगाबाद मधील क्रांती चौकात रविवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन सुरूच होते. त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. याआधी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये सुद्धा विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, माढा, इंदापूर भागांत आंदोलनाला हिंसक वळण लागून एसटीवर दगडफेकीच्या घटना घडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्याची वेळ आली होती. त्यानंतर बीड – परळी तहसील कार्यालय परिसरात युवकांनी अर्धनग्न आंदोलन पुकारले होते.

मराठा समाजाचे आंदोलन सध्या आक्रमक होत चालले असून सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना या आक्रमक आंदोलना विषयी विचारले असता ते म्हणाले की,’राज्यभरात मराठा आंदोलनाची दिशा बदलली असून, याला राज्य सरकारच जबाबदार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या सरकारने न्यायालयात शपथपत्र दिले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. यापुढे दिवसेंदिवस चिघळणाऱ्या आंदोलनाला सरकारच जबाबदार राहील.

दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या पोलीस कारवाई संदर्भात आमदार नितेश राणे म्हणाले की,’पोलिसांनी उगाच मराठा समाजाचा तरूणांना नोटीस आणि केसेस टाकून त्रास देऊ नये..आम्ही अपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहोत..केस आणि नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका..मी तयार आहे!!’.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x