27 April 2024 4:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सोशल मीडियामार्फत दोन गटांमध्ये धार्मिक वैर वाढवणे | PoK वक्तव्य | FIR दाखल होणार

Court orders, Filing of case, Kangana Ranaut, Rangoli

मुंबई, १७ ऑक्टोबर : अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

मुस्लिम असल्याने आपल्याला काम न दिल्याचा आरोप करत, साहिल सय्यद याने वांद्रे न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणीदरम्यान कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान असा उल्लेख करतही तिने ट्विट केले होते. त्या प्रकरणीही तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात शहरातील वकिलांनी बुधवारी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडिया पोस्टद्वारे दोन धार्मिक गटांमधील वैर वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता.

यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले असून याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर केले जातील. यानंतरच न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले. यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाच्या बाबतीत एवढ्या तक्रारी आल्या आहेत, की गृहखात्याने तक्रारी केली तर राजकीय हेतूने केल्याचे आरोप रामदास आठवलेंसह अनेकांनी केले असते. आता न्यायालयाने आदेश दिले आहेत.

 

News English Summary: Bandra Magistrate Metropolitan Court orders registration of police complaint against actor Kangana Ranaut (in file photo) and her sister Rangoli Chandel on allegations of a complainant that they tried to create a divide between communities with social media posts. A magistrate court in Bandra has ordered an FIR to be registered against Bollywood actor Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel, based on a complaint that accused the duo of “trying to create hatred and communal tension” through their tweets. The complaint was filed by casting director and fitness trainer Munnawarali Sayyed.

News English Title: Court orders filing of case against Kangana Ranaut and sister Rangoli News Updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x