21 October 2019 4:42 PM
अँप डाउनलोड

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

Devendra Fadanvis, BJP, Ajoy Mehta

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा कायदेशीर आणि प्रशासकीय अडसर दूर झाला. पुढील तीन दिवसांत अजोय मेहता अधिकृतपणे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. येत्या सप्टेंबरमध्ये अजोय मेहता निवृत्त होणार आहेत.

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बढती झाल्याने मुंबई महापालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर सध्या मुख्य सचिवपदी असलेले युपीएस मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची शक्यता आहे. युपीएस मदान यांची या वर्षीच्या मार्च महिन्यात मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. येत्या ऑक्टोबर महिन्यात मदान निवृत्त होणार आहेत, परंतु तत्पूर्वीच मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचं बोललं जातंय. युपीएस मदान यांना राज्य सरकारकडून महामंडळ अथवा आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(313)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या