14 December 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
x

हनीमुनच्या प्रवासातच तिने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

सातारा : साताऱ्यात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. कारण दीक्षा कांबळे हिने तिचा पती आनंद कांबळे याला हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाताना, प्रवासादरम्यानच संपविण्याची योजना प्रियकरासोबत रचली आणि पती आनंद कांबळे यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे. २६ मे रोजीच त्यांचा विवाह झाला होता.

दिक्षा कांबळे आणि तिच्या प्रियकराने ही घटना लुटमारीची घटना असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. परंतु सातारा पोलिसांना वेगळाच संशय आला आणि त्यांनी मृताची पत्नी दिक्षाला बोलतं केलं आणि सगळं गुपित बाहेर पडलं. पोलिसांनी दिक्षाचा प्रियकर नितीन मळेकर याला ताब्यात घेतलं आहे.

नक्की काय योजना आखली होती दीक्षा आणि तिच्या प्रियकराने?

कुटुंबाचा त्यांच्या प्रेम विवाहाला विरोध असल्यामुळे अखेर घरच्यांच्या मर्जीने तिने नात्यातीलच आनंद कांबळे याच्यासोबत २६ मे रोजी लग्न केलं. पुढे प्रियकरासोबत हनीमूनच्या प्रवासादरम्यान पती आनंद कांबळेच्या प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन खून करण्याची योजना आखली.

त्यानुसार पसरनी घाटात दीक्षाने तिला उलटी होत असल्याचा बहाणा करून गाडी थांबविण्यास सांगितली. गाडी थांबताच दोन युवक मोटरसायकलवरुन तिथे कोयते घेऊन आले आणि आनंद कांबळेवर जवळ जवळ १०-१२ वर केले. परंतु मारेकऱ्यांनी जाताना लुटमारीची घटना असल्याचे भासविण्यासाठी दीक्षा कांबळे हिच्या गळ्यातील मंगळसूत्रही काढून घेतल आणि फरार झाले.

रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू आधीच झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. सातारा पोलिसांनी दीक्षा कांबळे आणि प्रियकर नितीन मळेकर यांना ताब्यात घेतलं आहे. कोयत्याने हल्ला करून खून करणारे आरोप अजून फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x