14 May 2021 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच....
x

राज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त, मनसेकडून पेट्रोल ४ रुपयांनी स्वस्त

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. मुंबईतल्या एकूण ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गेले काही दिवस देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने सुद्धा हे दर वाढतच राहणार असं स्पष्ट केल आहे. त्यामुळे एकूणच वाहन मालक पुरते हैराण झाले आहेत.

केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात केंद्र सरकारला अपयश येत असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील एकूण ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर मनसेकडून ही सूट देण्यात येईल असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसे सत्तेत नसली तरी सामान्य मुंबईकरांच्या मदतीला एक दिवस का होईना थोडा दिलासा देणार आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये या घोषणेची चर्चा रंगली आहे. सत्ताधारी देऊ शकत नसले तरी, मनसेने एक दिवस का होईना पण मुंबईकरांना जर पेट्रोल सवलतीचा थोडासा दिल्यास ही ‘मनसे सवलत’ भाजपला चांगलीच अडचणीची ठरू शकते. कारण मनसेने फक्त टीकाच केली नाही तर १ दिवस का असेना, पेट्रोल दरात ४ रुपये एवढी मोठी सवलत देत मुंबईतील ३६ ठिकाणी ४ रुपयांनी स्वस्त पेट्रोल देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x