4 May 2024 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Punjab and Sind Bank Share Price | 31 रुपयांचा सरकारी बँकेचा शेअर, 7 महिन्यांत 145% परतावा, आता अजून एक मोठी बातमी

Punjab and Sind Bank Share Price

Punjab and Sind Bank Share Price | ‘पंजाब अँड सिंध बँक’ ने डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 373 कोटी रुपये निव्वळ नफा कमावल्याची माहिती आपल्या तिमाही निकालात दिली आहे. चालू आर्थिक वर्षात पंजाब अँड सिंध बँकेच्या नफ्यात वार्षिक आधारावर 23.92 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत पंजाब अँड सिंध बँकने 301 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत पंजाब अँड सिंध बँकेने ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 8.18 टक्क्यांची बंपर वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी, वार्षिक आधारावर बँकेच्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 3.61 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती बँकेने तिमाही निकालात जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Punjab and Sind Bank Share Price | Punjab and Sind Bank Stock Price | BSE 533295 | NSE PSB)

व्यवसाय 12 टक्के वाढला :
‘पंजाब अँड सिंध बँक’ ने आपल्या तिमाही निकालात माहिती दिली आहे की, “आर्थिक वर्ष 2022-2023 च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या एकूण नॉन-परफॉर्मिंग असेटमध्ये वार्षिक आधारावर 608 बेसिस पॉईंट्सची घट होऊन NPA प्रमाण 8.36 टक्केवर आले आहे. त्याच वेळी पंजाब अँड सिंध बँकेची निव्वळ अनुत्पादित मालमत्ता वार्षिक आधारावर 99 अंकांनी घटली असून 2.02 टक्क्यांवर आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचा एकूण व्यवसाय वार्षिक आधारावर 12.08 टक्क्यांनी वाढला असून 187242 कोटी रुपयांच्या पार गेला आहे. त्याच वेळी पंजाब अँड सिंध बँकेमधील एकूण ठेवीचे प्रमाण 9.11 टक्के वाढले असून 109497 कोटी रुपयेवर गेले आहे.

7 महिन्यांत 145 टक्के परतावा :
पंजाब अँड सिंध बँकच्या शेअरने मागील 7 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 145 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 20 जून 2022 रोजी पंजाब अँड सिंध बँकेचे शेअर्स शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 जानेवारी 2023 रोजी पंजाब अँड सिंध बँकेचे शेअर्स 31.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी पंजाब अँड सिंध बँकेचे शेअर्स 1.41 टक्के घसरणीसह 31.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44.75 रुपये होती. तर मागील 6 महिन्यांत पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअर्सची किंमत 113 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Punjab and Sind Bank Share Price 533295 PSB stock market live on 23 January 2023.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x