मुंबई : राज्याच्या जवाबदार मंत्र्यांची अनेक असंस्कृत प्रकरणं समोर आल्याचे पहिले आहे. परंतु, विषय तेव्हाच गंभीर होतं जेव्हा राज्याचे सांस्कृतिक मंत्री स्वतःच्या असंस्कृत वागण्याचं सार्वजनिकरित्या प्रदर्शन मांडतात. सामान्य माणूस देखील एखाद्याची हात मिळवताना सुद्धा उभा राहून सभ्यतेचे दर्शन घडवतो.
तसाच एक प्रकार महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. काही महत्वाच्या विषयांवर भेटीला आलेल्या सामान्य लोकांकडून त्यांनी ज्यापद्धतीने भिंतीला टेकू घेत निवेदन स्वीकारलं त्यावरून त्यांच्यावर समाज माध्यमांवर प्रचंड टीका करण्यात येत आहे.
मुद्दा यासाठीच महत्वाचा होतो कारण विनोद तावडे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि शालेय शिक्षणमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी दाखवलेला हा असंस्कृतपणा लोकांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळेच समाज माध्यमांवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारण अशी अपेक्षा एका जवाबदार मंत्र्यांकडून अपेक्षित नाही.
