27 July 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

बलात्काराच्या घटना दुप्पट, सरकारला महिलांच्या 'मन की बात' कधी कळणार ?

मुंबई : किती ही सरकार बदलली तरी स्त्रियांवरील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पेक्षा बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर छेदछाडीच्या घटनेत तब्बल १६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर खुद्द मुंबई पोलिसांनीच दिली आहे.

‘प्रजा’ या एनजीओने हे माहिती अधिकारात उघड केलं आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे असेच चित्र आहे. एकट्या मुंबई शहरात २०१२-१३ मध्ये बलात्काराच्या २९३ आणि छेडछाड-विनयभंगाच्या ७९३ घटना घडल्या होत्या. परंतु ५ वर्षात अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आकडेवारी सांगत आहेत. २०१६-१७ या कालखंडात मुबईसारख्या शहरात ५७६ बलात्कार तर २१०३ विनयभंगाच्या घटना घडल्याची धक्कदायक माहिती उजेडात आली आहे. बलात्काराच्या बळी ठरलेल्या एकूण आकडेवारी पैकी ७२ टक्के पीडित मुली ह्या अल्पवयीन आहेत.

मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली असली तरी गेल्या ५ वर्षांमधील आकडेवारीचा विचार करता बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे समजते. मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१२-२०१३ मध्ये बलात्काराच्या एकूण २९४ घटना घडल्या होत्या, तर २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ७२८ पर्यंत पोहोचलं आहे. परंतु २०१६-१७ मध्ये त्यात घट होऊन ते ५७६ पर्यंत येऊन ठेपले आहे. विशेष म्हणजे बलात्काराच्या बळी ठरलेल्या एकूण आकडेवारी पैकी ७२ टक्के पीडित मुली ह्या अल्पवयीन म्हणजे १२ ते १६ या वयोगटातील आहेत.

एकूणच ही आकडेवारी पाहता सरकार आणि समाज हा स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधात किती उदासीन आहे हेच या आकडेवारीतून दिसत आहे. पालकांनी त्यांच्या अल्प आणि किशोरवयीन मुलींना घराबाहेर पाठवायचे की नाही हेच पालकांच्या समजण्यापलीकडे गेलं आहे.

बुलेट ट्रेन आणि पुतळ्याचं राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारला ‘जिवंत स्त्रियांचं’ दुःख कळणार तरी कधी असा प्रश्न विचारला जात आहे. किंबहुना स्त्री सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने बघणारा असा नेता आहे का कुणी राज्यात असा प्रश्न अनेक स्त्रिया करत आहेत.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x