20 September 2020 10:44 PM
अँप डाउनलोड

दुधात पेट्रोल ओतणार्‍या विरोधी नेत्यांना आवरा, शिवसेनेची भाजपवर टीका

Saamana newspaper, BJP Milk price, Devendra Fadnavis

मुंबई, ३ ऑगस्ट : ‘दूध भुकटी आयातीचा निर्णय रोखावा. महाराष्ट्र, गुजरातसारख्या राज्यांच्या ताकदीवरच केंद्राचे दुकान चालले आहे. त्यामुळे पेटलेल्या दुधाचा भडका थांबवा आणि दुधात पेट्रोल ओतणार्‍या विरोधी नेत्यांना आवरा, सत्ता गेल्याने त्यांची डोकी कामातून गेली आहेत’ असं म्हणत शिवसेनेनं दूध दरवाढीवर आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून दूध आणि भुकटीच्या दरवाढीबाबत आंदोलनावर शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे. यावेळी केंद्राकडून मदत मागत भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

तसेच शेतकरी नेते राजू शेट्टी सरकारी आंदोलक आहेत, असा टोला मारणारे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भूतकाळाची आठवण करुन दिली आहे. , कालपर्यंत हेच शेट्टी फडणवीस यांच्या गोटात होते. तेव्हा ते सरकारी नव्हते काय? राजू शेट्टी यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन केले तेव्हा याच शेट्टींना फडणवीस खांद्यावर घेऊन मिरवत होते. आज शेट्टी यांची जागा सदाभाऊ खोतांनी घेतली असे अग्रलेखात म्हटले आहे.

 

News English Summary: The Shiv Sena has presented its position on the agitation regarding the price of milk and powder from the daily match which is the mouthpiece of the Shiv Sena. At this time, BJP leaders have been criticized for seeking help from the Center.

News English Title: Saamana newspaper article on BJP Milk price protest and Devendra Fadnavis News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Saamana(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x